Sunday, January 6, 2013

तेजाचं अंकुर

लपून लपून तिला पाहण्यासाठी मनाची धांदल उडते

तिचं अचानक लक्ष गेल्यावर मात्र बोबडीच वळते....

पण तिचं असं अचानक नजर फिरवणं असला आनंद देऊन जातं

तीही आपल्याकडे बघते हे हळूच कानात सांगून जातं....

का कोणास ठाऊक मन थाऱ्यावर राहत नाही

तिला पाहिल्याशिवाय कशातच लक्ष लागत नाही....

तिचं उस्फुर्त हसणं काळजाचा ठेका धरतं

अन अंधारलेल्या ह्या खोलीत तेजाचं अंकुर स्फुरतं....

4 comments:

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट