Saturday, March 31, 2012

कधी गवसेल का पुन्हा....


आधीचा तो मी....
कधी गवसेल का पुन्हा मला....?
श्यामळू आणि एकलकोंडा....
तसाच परत मिळेल का मी मला....?
स्वप्नांच्या दुनियेत हरवलेला....
मी माझ्याचपासून दुरावलेला....
मी कोणत्या विश्वात गेलेला....
मिळेल का पुन्हा मला....?
एकटाच गेलो अनंताहुनी दूर....
एकट्याचे गाणे, एकटेच सूर....
पूर्वीचा तो मी अवखळ आणिक खट्याळ,
अनंतातल्या ताऱ्यासारखा स्वच्छंदी, आईचा तो बाळ....
फुलपाखरांमागे फिरणारा, मृगांच्या थेंबांचा तो रसिक
कधी गवसेल का पुन्हा....?
बद्कांमधला तो राजहंस ओळखेल का स्वतःला....?
अस्तित्व स्वतःचं कधी निर्माण करता येईल का त्याला...?
आकाशाच वेड लागलच जर त्याला....
घराची आठवण येईल का त्या पाखराला....?
आधीचा तो मी....
कधी गवसेल का पुन्हा मला....?

Thursday, March 22, 2012

च्याआईला.... प्रेम करायला जमलच नाही.....

प्रेम काय असतं हे कधी उमगलंच नाही.
त्यामुळे प्रेम करायला जमलच नाही......

 कधी कोणाच्या इतक्या जवळ गेलोच नाही.
त्यामुळे प्रेम करायला जमलच नाही...... 

आपली अशी कोणीतरी "स्वप्नात सुद्धा" भेटली नाही.
त्यामुळे प्रेम करायला जमलच नाही...... 

मैत्री तुटू नये म्हणून प्रेम व्यक्त केलंच नाही.
त्यामुळे प्रेम करायला जमलच नाही...... 

करिअर च्या दिशेला जाताना प्रेमाचा विचार केलाच नाही.
त्यामुळे प्रेम करायला जमलच नाही...... 

एवढा बिझी झालो, की प्रेमाचा विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नाही.
त्यामुळे प्रेम करायला जमलच नाही......

मनात कायम एक खंत राहून गेली.....
च्याआईला.... प्रेम करायला जमलच नाही.....

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट