Saturday, June 3, 2017

तू फक्त ढग बघ...

तू फक्त ढग बघ....

रखरखत्या उन्हाची रग बघ
ऊन सावलीचा वग बघ

तू फक्त ढग बघ...

हल्ली क्वचितच दिसणारा खग बघ
देव नावाचा ठग बघ
एकेक राजकारणी नग बघ
पावसासाठी शेतकऱ्याचा तग बघ


तू फक्त ढग बघ...

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट