Wednesday, January 18, 2012

मलाही काही कळत नाही


तुझ्या माझ्या आयुष्याचे यमक काही जुळत नाही,
कविता कशावर करू "विषय" काही मिळत नाही.

रोज तुला मागूनही तू मला मिळत नाही,
देवालाही कदाचित ओढ प्रेमाची कळत नाही.

प्रेमात पडताना मन स्वतःला सांभाळत नाही
विचार करताना "तुझा" कधीच ते कंटाळत नाही.

काय झालंय मला हे, मलाही काही कळत नाही,
म्हणतात ना की प्रेमाच्या वळणावर अपघात काही टळत नाही.

माझ्यातला "मी" आणि स्वप्नातली "तू" एकरूप काही होत नाही,
यामुळेच हल्ली झोप मला येत नाही.....


Sunday, January 15, 2012

आवडलेली मला ती


पाहिल्यावरच आवडलेली मला ती,
जणू काही वेगळीच होती कला ती,
न संपणाऱ्या क्षितिजापर्यंत आठवणारी आठवण ती,
की जागेपणीही स्वप्नात दिसणारी एक सुंदर स्वप्न ती....
झाडावर उमलणारी एक नाजुकशी कळी ती,'
की हसताना गालावर पडणारी एक अवखळ खळी ती....
शहाळाच्या तृष्णेसारखी निसर्गाची किमया ती,
की हरिणाला भासणारी मृगजळाची माया ती...

शब्द

शब्दांची माणसं शब्दांच्याच बाहुल्या,
आयुष्य म्हणजे जणू शब्दांच्याच साउल्या...
शब्दांमध्येच जगतात, शब्दांमध्येच मरतात,
सगळं संपल्यावरही शेवटी शब्दच उरतात...
शब्दांच्या किनाऱ्यावर शब्दांच्या लाटा,
शब्दांचाच प्रवास आणि शब्दांच्याच वाटा...
शब्दांची बंधने शब्दांची नाती,
शब्दांना शब्द जोडून काय लागेल हाती...?
शब्दांचेच इंद्रधनुष्य शब्दांचा रंग,
जसा शब्दांना मिळालेला शब्दांचा संग...
शब्दांनी सुरुवात शब्दांनीच अंत,
शब्दांच्या खेळात सर्वच संत....





Friday, January 6, 2012

NSS Camp

Back From NSS Camp... It Was Good Experience....
As I'm in TY this was my last camp.....:(
this camp brings new people in my life....
juniors and some super juniors.... Shingte And MJ Sir Was There in Camp For Some Days.... Can't Forget Those Days....

जो पर्यंत पद्या कॅम्प ला होता तो पर्यंत काहीही प्रॉब्लेम नव्हता...
नंतर अख्खं किचन आमच्या ताब्यात आलं....
मग काय रोज आमच्याच पसंतीचा स्वयंपाक... कधी पनीर, कधी वाटाण्याची भाजी, बदामाचा शिरा....
शेवटचे २ दिवस फक्त किचन आमच्याकडे नव्हतं....  तेव्हा हाल झाले खरे.... कोबी.... अर्रर्र्र
रोज चपात्या शेकायला, कांदे,मिरच्या,टोमेटो चिरायला आम्हीच असायचो.
पहिले ३ दिवस आणि शेवटच्या दिवसाआधी रात्री भांडी घासायला आमच्याकडे होती....
गम्मत म्हणजे आम्ही सिनिअर असल्यामुळे आम्हाला हे काही नवीन नव्हतं 
जेव्हा मी माती उचलून त्याने ताट घासलं तेव्हा जवळपास जेवढ्या मुली उभ्या होत्या त्यांचा एकाच आवाज आला एकसाथ ईईई...... हा हा मला हे अपेक्षित होतच म्हणा....

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट