Wednesday, April 23, 2014

इतकच

लिहायला बसल्यावर कधी
शब्द अडत नाहीत....
तू सोबत नसतेस
म्हणून ते भिडत नाहीत...

कोडं

देवालाही एक
कोडं पडलं असेल...
कुणास ठाऊक कस
हे येडं घडलं असेल... 

सुन्न

तुला पाहिल्यावर,
मन प्रसन्न होतं...
पण आपलं जमत नाही
हे लक्षात आल्यावर ते सुन्न होतं...

ठाऊक

तू मनमोहक
आणि मी भावुक...
जमत नाही आपलं
आहे मला ठाऊक...

Monday, April 14, 2014

मागणं

तिला कवेत घेत
आयुष्याच सुंदर चित्र रंगलं होतं.....
नेमकी बेल वाजली,
आणि स्वप्न ते भंगलं होतं.....

मग फक्त एकच मागणं
मी मागितलं होतं.....
देवा,
मी झोपलेलोच चांगलं होतं.....

Thursday, April 10, 2014

स्मशान

माणुसकी संपली
असा मनामनांत ठसवलं,
जेव्हा तुम्ही स्मशानातल्या महादेवाला
भर चौकात आणून बसवलं...

Wednesday, April 2, 2014

प्रश्न

तिच्या मेंदूस एक प्रश्न
कायम झोंबत असावा,
हा वाराच तिचा पत्ता
मला सांगत असावा...!

बादशाहत

में फकीर लाख ही सही....
शुक्र है खुदा ने ऐसे नायाब दोस्तों से नवाझा,
इस बादशाहत के बदले तो फिर जिंदगी खाक ही सही...!

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट