माझी गेले ५ वर्षे नरक चतुर्थीला उशिरा उठून नरकात जाण्याची परंपरा दुर्दैवाने आज पण चालूच राहिली ..
शेवट उटणे अंगाला लागण्या आधी उशिरा उठतो म्हणून काही शब्दांचा फराळ अंगी लागला ..त्याची सांगता सकाळी सकाळी गोडाने झाली ..
आता आमच्या आधी सूर्य नारायण आकाशात डोळे उघडतो ह्यात आम्ही काही नाही करू शकत .. ह्या निसर्गाची भलतीच हुकुम शाही आहे ,,
अहो रात्री उशिरा जगण्याची मजा काही औरच पण जो रात्री जगतो त्याला घुबड,वटवाघूळ तर जो सकाळी उठतो त्याला वासुदेव असे संबोधण्याची एकांगी परंपरा आपल्या कडे आहे.