Monday, April 2, 2012

जेता

तो सूर्य तोच आहे,
ते नभ तोच आहे,
सोनेरी ढगांचे सौंदर्य तोच आहे....

तो चंद्र तोच आहे,
तारे ही तोच आहे,
चांदणे शिंपलेली निशा तोच आहे...

युगंधर तोच आहे,
वसुंधरा ही तोच आहे,
पानाफुलात दरवळणारा गंध तोच आहे...

तुषार तोच आहे,
वारा ही तोच आहे,
पहिल्या पावसानंतरचा मृद्गंध तोच आहे...

चक्षु ही तोच आहे,
कर्ण ही तोच आहे,
या मुखांसवे वदणारा आवाज तोच आहे...

मीही तोच आहे,
तुही तोच आहे,
या देहाचा मूर्तिकार तोच आहे...

तो अजाण आहे,
तो सर्वज्ञात आहे,

या सर्वांचा जेता तो निसर्ग आहे....:)

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट