Thursday, December 15, 2011

गुरुवार

       माझा जन्म तसा शनिवारचा, फाल्गुन अमावस्या. अमावस्या आणि शनिवार एकाच दिवशी..... लोक म्हणतात की हा वाईट दिवस असतो... असो. मला चांगला जातो शनिवार मुळात माझ्या जन्म कुंडलीतच कुंडली काढनाऱ्याने अस लिहिलंय की मला शनिवार चांगला जाईल, आणि अजून असा स्पष्ट लिहिलंय की गुरुवार माझ्यासाठी घातवार असेल म्हणून तसं पाहायला गेला तर मला यावर विश्वास अजिबात नाही. पण माझ्याबरोबर ज्या घटना घडतात त्या मला यावर विचार करायला विवश करतात. का कुणास ठाऊक मला गुरुवार अजिबात चांगला जात नाही... कधीच...  
        माझा अपघात झाला होता १० वी मध्ये असताना. तोही जीवघेणा. गुरुवारीच... अजूनही आहेत काही आठवणीतले प्रसंग... मला खास गुरुवार ची आठवण काढून देणारे... पण ते मी इथे आता नाही सांगत... 
       आजचच उदाहरण घ्या ना आज गुरुवार. नेहमीप्रमाणे खराब जायचा तो गेलाच... मला रोजच्या गरजेच्या एका साईटवरून कायमचा Ban केला गेला... कारण नसताना.... असो. म्हटला दुसरा अकाउंट काढून मग वापरू पण नाही  त्यांनी माझा IP & MAC Address हे दोन्ही पण Ban केल्यामुळे. मी माझ्या पीसी वर टी  साईट नाही पाहू शकत.
       त्यात भर म्हणून  आज माझ्या एका नुकत्याच झालेल्या Friend ने पण मला ब्लॉक केला. का ते माहित नाही. आणि विचारायची इच्छा पण नाही.
       ITEXPO ला गेलो तर त्यांनीही तिकीट काउंटर वर ३० रुपयांना चुना लावलाच. पैसेच परत दिले नाही. आणि विशेष म्हणजे एरवी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणारा मी(अभ्यासाला हे  लागू होत नाही) मला पैसे परत घ्यायचे लक्षातच नाही राहिलं.
       काय माहित मे काय घोडं मारलय या गुरुवार चं......

असो... आपण भेटू परत... टा.टा. 

1 comment:

  1. I don't believe in it and would be pleased to bring you out of this Blind Belief!

    ReplyDelete

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट