Sunday, December 18, 2011

मराठी विकिपीडिया

नमस्कार मित्रहो.
पुण्यात दरवर्षी डिसेंबर मध्ये आयटी एक्स्पो हा कॉम्पुटर शी निगडीत वस्तू आणि सेवांचा मेळावा आयोजित केला जातो. आम्ही दरवर्षी न चुकता ह्या मेळाव्यास उपस्थिती लावतो. या मेळाव्यात या वर्षी विकिपीडिया चा  Stall होता. याबद्दल खास नमूद करतोय कारण की विकिपीडिया आता स्वतःची मराठी प्रत सुरु करत आहे त्यासाठी त्यांना मराठी एडिटर्स ची गरज आहे. आयटी एक्स्पो च्या माध्यमातून विकिपीडियाने मराठी लोकांशी संपर्क साधला. जानेवारी मध्ये या सर्व मराठी एडिटर्स ची एक सभा होणार आहे. ज्यामध्ये विकिपीडिया या एडिटर्स ना प्रशिक्षण देऊ करत आहे. वाचून तुम्हालाही आनंद होत असेल नाही. अर्थातच आता मराठी पाउल पडते पुढे.....:)
जय महाराष्ट्र.

1 comment:

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट