Monday, June 20, 2016

एक पेग

मी एक पेग पितो
दारू सोडण्यासाठी
पुन्हा पुन्हा स्वतःच
मन मोडण्यासाठी

मी एक पेग पितो
हवेत चालण्यासाठी
मनाचा शांतपणाशी
वाद घालण्यासाठी

मी एक पेग पितो
स्वतःला आवरण्यासाठी
विस्कटलेल्या मनाच
अंगण सावरण्यासाठी

मी एक पेग पितो
गर्दीचा होण्यासाठी
एकांतांच्या गर्दीत
स्वतःला सामावण्यासाठी

मी पेग पेग पितो
शांत निजण्यासाठी
प्रेतांच्या दुनियेत
निपचित पडण्यासाठी

4 comments:

भेट

सूर्य चंद्र मावळतो तिथे व्हावी आपली भेट एका हृदयांतल बोलणं दुसऱ्या हृदयाशी थेट