आठवतं मला...
जेव्हा तुला पाहिलं होतं,
ऋतूही बहरला होता,
आभाळही मग दाटून आलं
होतं....
आठवतं मला...
जेव्हा तुला पाहिलं होतं,
होशील का तू माझी...?,
या विचाराने डोक्यात थैमान
मांडलं होतं....
आठवतं मला...
जेव्हा तुझ्याशी बोललो होतो,
अख्खा दिवस “त्या” आनंदात वेड्या
सारखा फिरलो होतो...
आठवतं मला...
जेव्हा तू पाहून हसायची,
आणि माझी बोबडीच वळायची....
बोलणं मनातलं मनातच राहून
दुसऱ्याच विचारांची गर्दी जमायची....
kay hotay sopya
ReplyDeletejhala ka re je hota navat te ha???? :P
ReplyDeleteAjun tari NAhi bua...:p
ReplyDelete