शब्दांची माणसं शब्दांच्याच बाहुल्या,
आयुष्य म्हणजे जणू शब्दांच्याच साउल्या...
शब्दांमध्येच जगतात, शब्दांमध्येच मरतात,
सगळं संपल्यावरही शेवटी शब्दच उरतात...
शब्दांच्या किनाऱ्यावर शब्दांच्या लाटा,
शब्दांचाच प्रवास आणि शब्दांच्याच वाटा...
शब्दांची बंधने शब्दांची नाती,
शब्दांना शब्द जोडून काय लागेल हाती...?
शब्दांचेच इंद्रधनुष्य शब्दांचा रंग,
जसा शब्दांना मिळालेला शब्दांचा संग...
शब्दांनी सुरुवात शब्दांनीच अंत,
शब्दांच्या खेळात सर्वच संत....
शब्दांची व्यथा
ReplyDeleteशब्दांची गाथा
शब्दांची बंधने
आणि शब्दांचीच माया
शब्दांच्या खेळात सर्वच दंग
शब्दांच्याच खेळात येथे होतो मनोभंग !!!